BIG BREAKING | सूर्यनगरीत घरफोडी करणारा अटकेत;सोनाराला घेतले ताब्यात पोलिसांची कारवाई…


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील सूर्यनगरी परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याच्या दोन घटना ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आणि ११ जानेवारी रोजी दुपारी घडल्या होत्या.याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत.श्रीकांत अशोक बिरादार (रा. सूर्यनगरी,बारामती) हे महावितरण शाखा सणसर येथे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.७ फेब्रुवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाऊन सायंकाळी घरी परतल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या पत्नी प्रज्ञा यांनी कपाटातील दागिने ठेवलेला कप्पा उघडा असल्याचे पाहिले. कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त अवस्थेत असून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच अंदाजे १० हजार रुपये रोख रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले.पत्नी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत मुलाला खेळवण्यासाठी खाली रस्त्यावर घेऊन गेल्या असताना घराचा दरवाजा पुढे लावलेला होता.याच वेळेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून चोरी केली आली आहे.

यामध्ये सोन्याचे मिनी गंठन (१७.५ ग्रॅम) ५०,०००, सोन्याचे काप (८ ग्रॅम) २०,०००, सोन्याचे एअररिंग (४ ग्रॅम) १०,०००, दोन सोन्याच्या अंगठ्या (६ ग्रॅम) १०,०००, चांदीचे पैंजण १,०००, रोख रक्कम १०,००० असा एकूण अंदाजे किंमत २ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेलेला आहे.याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.सुरेंद्र वामनराव चव्हाण ( सुमन रेसिडेन्सी फ्लॅट नं.3 सूर्यनगरी ता. बारामती ) यांच्याही घरी अशाच घटना होऊन ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरी झाले होती.तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी तांदुळवाडी येथून ऋषिकेश विजय कोकाटे रा.अंबिकानगर,इंदापूर) याला ताब्यात घेतले.न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली देत चोरीतील सोन्याचे दागिने सोनार श्रेयस विठ्ठल कुलथे (वय २५ रा.व्यंकटेश नगर, इंदापूर) याच्याकडे दिल्याचे सांगितले.त्यानुसार पोलिसांनी सोनार कोलते यालाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार केदारनाथ बिडवे,सुरेंद्र वाघ,भारत खारतोडे, मनोज पवार,जितेंद्र शिंदे,राहुल मखरे,सुरेश लांडगे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे स्वप्निल अहिवळे,अभिजीत एकशिंगे यांच्या पथकाने केलेली आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *