Baramati | बारामतीत प्रभाग 13 मध्ये तुतारीच्या उमेदवाराकडून मतदारांना आमिष दिल्याचे प्रकार ? नागरिकांत दबक्या आवाजात चर्चा..


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती नगरपरिषदेची निवडणूक पुढे ढकलल्याने मध्यंतरी प्रचाराला काहीसा बेक लागला होता.आता नव्या वेळापत्रकानुसार 20 डिसेंबरला मतदान होणार असल्याने शहरात पुन्हा प्रचार सुरू झाला आहे.शहरभर स्पीकर लावून विविध पक्ष,अपक्षांच्या रिक्षा प्रचारासाठी फिरत आहेत.बारामती नगरपरिषद निवडणूक प्रचाराचे मध्यंतरी शांत झालेले वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे.उमेदवार, कार्यकर्त्यांनी मतदारांशी संवाद साधण्याचा वेग वाढवला आहे.शहरातील प्रमुख भागांत पदयात्रा,संवाद,कोपरा सभा, दरोदारी भेटींचा उत्साह पुन्हा दिसू लागला आहे.

बारामती नगरपरिषद निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरात प्रचार सुरू आहे. निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना निवडून द्यावे,यासाठी वेगवेगळी आमिष मतदारांना दाखवली जाताहेत.यामध्ये प्रामुख्याने प्रभाग 13 मध्ये तुतारीचे उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांना आमिष दाखवण्याचे प्रकार करीत असल्याची चर्चा आता बारामती परिसरात रंगू लागली आहे..जेवणाचे डिनर सेट मतदारांना देऊन एक प्रकारे हे उमेदवार आचारसंहितेचा भंग करीत असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे..झगडे गॅरेज ते तावरे बंगला परिसरात असे डिनर सेट मतदारांना वाटत असल्याचा व्हिडीओ देखील महाराष्ट्र टूडेच्या हाती लागला आहे..

पण मताचा अधिकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिला आहे.तेच मतदान प्रत्येक नागरिकाला कुणालाही देण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.पण मतदारांना आश्वासनं दिली जात आहेत.दुसरीकडे आपण पुरोगामीचा टेंभा मिरविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या काही उमेदवाराकडून मतदारांना आमीष दाखवण्याची संस्कृती वाढत आहे.हे कितपत योग्य आहे? पुरोगामी म्हणणाऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना हे शोभनीय आहे का ? याला वेळीच आळा घातला पाहिजे,अशी चर्चा देखील आता रंगू लागली आहे..त्यामुळे अशा उमेदवारांना निवडणूक आयोग कारवाई करणार का ? हा सवाल आता उपस्थित केला जातोय..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *