BIG BREAKING | पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ;पोलीस नाईक बेपत्ता अधिकाऱ्यावर गंभीर आरोप…


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून व मुलीच्या वाढदिवसाला सुट्टी न दिल्याने पोलीस दलातील एक कर्मचारी मी जीवाचे बरे वाईट करत असल्याची पोस्ट तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करून गायब झाल्याने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस नाईक निखिल रणदिवे यांनी व्हाट्सअप वर स्टेटस ठेवले आहे.त्या टेटस वर त्यांनी स्वतःच्याच फोटोवरच भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहून पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. रणदिवे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मुलीला असे लिहिले आहे की, माझी प्रिय दीदी,आज तुझा पहिला वाढदिवस पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता पण मी पोलीस नोकरी करतो तिथे वरिष्ठांची मनमानी चालते तसेच चार-पाच दिवसांपूर्वी तू आजारी होतीस पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव,अहिल्यानगर येथे कर्तव्यासाठी नेमल्यामुळे तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता आले नाही..

यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे मला गेले एका वर्षापासून सतत त्रास देत आहेत.माझा नाईलाज आहे.त्यामुळे मी जीवाचे बरे वाईट करून घेत आहे.माझ्याकडून दीदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा तसेच स्वतःच्याच फोटोवर भावपूर्ण श्रद्धांजली लिहून पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.तसेच निखिल रणदिवे हे बेपत्ता झाले असून त्यांचा गुरुवारपासून फोन बंद आहे..

पोलीस नाईक निखिल रणदिवे यांची मागील एका वर्षांपूर्वीच बदली झाली होती परंतु यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी बदलीच्या ठिकाणी सोडले नाही या त्रासाला कंटाळून पोलीस नाईक रणदिवे हे जीवाचे बरे वाईट करत आहेत असे सांगून मागील दोन दिवसांपासून गायब झाले आहेत त्यांचा फोन बंद लागत आहे.

सुसाईड नोट

पोलीस नाईक निखिल कैलास रणदिवे यांनी सुसाईड नोट लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे गेले एका वर्षापासून मानसिक त्रास देत आहेत.माझी सन 2025 मध्ये शिक्रापूर पोलीस ठाण्यात सर्वसाधारण बदली झाली आहे..परंतु मला बदली ठिकाणी कार्यमुक्त न करता त्रास दिला जात आहे सदर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना त्रास देऊन खच्चीकरण करत आहे त्यामुळे देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे माझ्या मृत्यू नारायण देशमुख जबाबदार आहेत असे सुसाईड नोट मध्ये लिहिले आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *