मनोहर(मामा )भोसले पासून माझ्या जीवितास धोका…


इंदापूरच्या रवींद्र म्हेत्रे यांची करमाळा पोलिसांत तक्रार…

इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज (संपादक : विकास कोकरे )

करमाळा तालुक्यातील उंदरगांव येथील सद्गुरू संत बाळूमामाचे भक्त मनोहर (मामा )भोसले यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतच आहेत.त्यांच्यावर गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या प्रकारचे आरोप देखील झाले आहेत.मनोहर भोसले हे स्वतः ला बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगून लोकांकडून लाखो रुपयांची लूट करीत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या असुन, मनोहर भोसले याबाबत पुण्यात पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळून लावले असतानाचं इंदापूर तालुक्यातील काझड (शिंदेवाडी) येथील रहिवासी असणारे रवींद्र रघु म्हेत्रे यांनी “मनोहर (मामा ) यांनी आपली फसवणूक केली आहे,तसेच त्यांच्यापासून माझ्या जिवितास धोका आहे,असा तक्रारी अर्ज मंगळवार (दि.३१ )ऑगस्ट रोजी करमाळा पोलीस ठाण्यात दिला आहे.

यापूर्वी बारामती येथील महेश नानासाहेब आटोळे यांनी देखील मनोहर भोसले विरोधात तक्रार दाखल केली आहे.अंधश्रद्धेतून सात लाखाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी आपल्या तक्रारी अर्जात केला आहे. त्यानंतर रवींद्र म्हेत्रे यांनी मनोहर भोसले फसवणूक केली असून मला त्यांच्यापासून जिवितास धोका आहे,त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा तक्रारी अर्ज करमाळा पोलीसात दिल्याने मनोहर भोसले यांच्या अडचणीत वाढताना दिसत आहेत.यांनी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *