पत्रातून शरद पवारांचे नाव न घेता केले गंभीर आरोप…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
विधानसभा निवडणुका जसजशा तोंडावर येत आहेत, तसतशी बारामतीत मी निनावी पत्रांचा सिलसिला सुरू आहे,या अगोदरही बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव न घेता त्यांना उद्देशून एक निनावी पत्र व्हायरल झालं होतं, आणि आता पुन्हा एकदा शरद पवारांना उद्देशून एक मी निनावी गब्बर नावाच पत्र व्हायरल झाल असून,या पत्रातून शरद पवारांवर गंभीर आरोप करण्यात आलेत… युगेंद्र पवार यांना बारामतीकारांवर लादू नका,असे लिहीत शरद पवारांवर गंभीर करण्यात आलेत..
या पत्रातून मोठ्या साहेबांवर म्हणजे शरद पवारांवर न बोलणे म्हणजे तोंड राहुल जाता बुक्क्यांचा मार, जो भोळ्या पापड्या बारामतीकरांना भावनिक करून लोकसभेत दिला..आणि धाडसाने बोलणं म्हणजे साहेबांच्या विचारांना चॅलेंज आहे… या पत्रातून ताई निवडणुकांपूर्वी खूप शुद्ध बोलून बेशुद्ध करायचा मात्र आता कार्यकर्त्याचे येणारे फोन फोनच उचलत नाहीत, त्यामुळे तुम्ही आता नोकिया लेकराला खुर्ची देऊन राजकारणाचा आणि तुमच्या विश्वासहार्तेचा पोरखेळ करून संगीत खुर्ची मांडल्याचा आरोप केलाय..
तसेच बारामतीने चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याकरता भरभरून प्रेम दिलं त्यामुळे तुम्ही तुमचा वारसा दादांना दिला तुमचे मार्गदर्शन आणि दादांचे परिश्रम यातून बारामतीचा विकास झाला मग दादांनीही आपलं कौशल्य दाखवत बारामतीचा दहापटीने विकास केला, मग असं असताना देखील एका नातवाला राजकारणात आणण्याचा प्रयोग तुम्ही केला आणि जिल्हा परिषद सदस्य केला मग अनुभव आल्यावर त्याला आमदार केला आता तो नातूही तिकडं सेट झालाय मात्र आता ही विषाची परीक्षा कशासाठी ? आता आणखीन एका नातवाला डायरेक्ट आमदार करून विकास भकास करायला निघालाय..!!
त्यामुळे तर दलित आणि मुस्लिम या दोन्ही समाजात खोटं भीतीचं आणि धार्मिक तेढांच वातावरण पुसून संभ्रम निर्माण करीत आहात आणि तुमच्याच पुतण्याला ( दादांना ) जो तुमच्याच विचाराचा वारसदार आहे त्याला खलनायक बनवण्याकरिता भगवे काढायला लावत आहात संविधान बदलण्याच्या दाट शक्यता आहेत असं प्रचार करीत आहात.. साहेब लोकसभा निवडणुकीत आपण किती आश्वासने दिली की आम्ही निवडून आल्यावर कामे टेंडर दरीत मुस्लिम बहुजनांना देऊ मात्र आता मिशीवाले खर्डा दाढीवाले लाभार्थी मलिदागी खातायेत व लोकसभेला पळणारे कार्यकर्ते वाऱ्यावर फिरतायेत.. यातून तात्पर्य काय की खरी मलिदाग्यांत उपाशी व कार्यकर्ते उपाशी..
साहेब तुमच्या काळजाचा तुकडा असणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने भारताचा शत्रू असणाऱ्या देशद्रोही व मुंबई बॉम्बस्फोटामधील मुख्य आरोपीचे किमान 2900 कोटी रुपये स्थावर संपत्तीमध्ये गुंतवणुकीचे प्रकरण किती हिताफीने दाबले त्यासंबंधी महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन तत्कालीन विरोधी पक्ष नेत्याने एका बारामतीच्या वकिलाच्या व दोन पत्रकारांच्या पेन ड्राईव्ह दस्त व माहितीच्या आधारे गाजवले, त्यावेळी तर सत्ता आपल्याकडे होती तुम्हीच सजवलेले सगळे मंत्रिमंडळ होते पण या पापी देशद्रोह्यावर देखील आपण निर्णय जर केली व प्रकरण जैसें थे झाकले..
साहेब ज्यावेळी मराठा आरक्षणाचे आंदोलन जोडधरत महाराष्ट्रभर फेकले होते त्यावेळी तुमच्या घरातील एका नातवाने तुमच्यासमोर उर काढला व त्याने एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा आरक्षणाचे समर्थन करीत एक ट्विट केले, त्यावेळी तुम्ही त्याच्यावर डोळे वटारले व नंतर तुम्ही म्हणाला की लहान लहान मुलांच्या गोष्टी मी मनावर घेत नाही.. मात्र साहेब तुम्ही एका दुसऱ्या नातवाला त्याच्यापेक्षा लहानग्याला ( दादांच्या पुतण्याला ) पुढे करून बारामतीचा आमदार करून आमच्यावर जबरदस्त लेण्यादण्याचा प्रयत्न करीत आहात.. तर दुसऱ्या नातवाने ( दादांचा मुलगा ) तर पाच वर्षांपूर्वी खासदारकीची निवडणूक लढवली मात्र या नातवाला तर जनतेचे कसलेच प्रश्न कळत नाहीत काही जरी विचारलं तरी एकच उत्तर..!!
त्यामुळे उद्या बारामतीच्या जनतेने त्याच्याकडून कसल्या विकासाची अपेक्षा करायची ? त्यामुळे साहेब तुम्हीच सांगा ही सगळी तुमच्याच रक्ताची माणसं दादांच्या कामाची अनुभवाची तुलना ( दादांचा पुतण्या ) नवख्या पोराशी होऊ शकते का ? त्यामुळे साहेब तुमच्या घरगुती कल हा पाई आम्हा बारामतीकरांवर हे रोजे लाजू नका ही लढाई फक्त तुमच्या घरातील श्रेयवादाची नाही तर ही लढाई बारामतीकरांच्या भवितव्याची आहे.. त्यामुळे व्यावहारिक विचार करा आणि आम्हास गृहीत धरण असं बंद करा.. आणि हो मागच्या पत्रात दादांवर बोललो आज तुमच्यावर कारण जे खरं आहे ते मी बोलणारच.. असं लिहिला असून आपला गब्बर या नावाने हे पत्र व्हायरल झालय…