बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत.आज बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून राज्यपालांविरोधात सह्यांची मोहीम राबवण्यात आली.राज्यकर्त्यांनी तात्काळ राज्यपालांची हकालपट्टी करावी अन्यथा त्यांच्याविरोधात तीव्र लढा उभारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.आज सकाळी बारामती शहरातील तीन हत्ती चौकात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माध्यमातून सह्यांची मोहीम राबवण्यात आली.
सातत्याने राज्यपाल महापुरुषांचा अवमान करतात. मात्र सत्ताधारी त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाहीत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.त्यामुळे त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी केली.तर राज्यपालांसह भाजप नेते सातत्याने छत्रपती शिवरायांसह महापुरुषांबद्दल महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यामुळे यापुढे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील,बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव,माजी नगराध्यक्ष योगेश जगताप,पौर्णिमा तावरे,युवकाध्यक्ष अविनाश बांदल, महिला अध्यक्षा अनिता गायकवाड,वनिता बनकर, आरती शेंडगे,सोशल मिडिया अध्यक्ष तुषार लोखंडे, अभिजीत जाधव,सूरज सातव,सुधीर पानसरे, नवनाथ बल्लाळ,पप्पू चव्हाण,बबलू जगताप,मयूर लालबिगे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह नागरीक व विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेत राज्यपालांच्या हकालपट्टीच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.