बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळेंचा आज मतदारसंघाचा नियमित दौरा होता.यावेळी मतदारसंघातील विविध ठिकाणी भेटी देत आढावा घेतला. यावेळी, माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं आहे.यावेळी सुप्रिया सुळेंनी
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच बदल्याची भाषा ऐकली असल्याचे सांगत नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
यावेळी संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केल्याचा प्रश्न विचारताच राऊत्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे.हर हर महादेव बाबतचा वाद यावरही बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,एखादा सिनेमा जेव्हा ज्याला फिक्शन आणि नॉनफिक्शन म्हणतो आपण जर तो सिनेमा इतिहासावर असेल त्याच्यात लिबर्टी घेणे हे किती योग्य आहे.या सिनेमाची चर्चा आता राजकिय नसून सामाजिक प्रश्न झालेला आहे…आणि त्याचबरोबर छत्रपतीचा इतिहास जर कोणी चुकीच्या पद्धतीने दाखवत असेल तर त्याचा जाहीर निषेध केलाच पाहिजे.अशी भूमिका देखील सुळेंनी जाहीर केली.