CRIME NEWS : दौंड तालुक्यातील सराफ व्यवसायिकाला भरदिवसा लुटले ; ६२ तोळ्यांच्या दागिन्यांवर मारला डल्ला मारत तब्बल ३० लाख केले लंपास..!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

दौंड तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने वारंवार चोऱ्यांच्या घटना घडत असून,आता दौंड मधील सराफ व्यवसायिकाच्या हातातील बॅगेवर भरदिवसा डल्ला मारत तब्बल ६२ तोळे सोने लुटून नेले असल्याची घटना घडली आहे.दौंड शहरातील शालिमार चौक येथील रत्नत्रय ज्वेलर्स या सराफ व्यवसायिकाची तब्बल ३० लाख १८ हजार ५०४ दागिने असलेली बॅग चोरट्याने लंपास केली आहे.दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी रत्नत्रय ज्वेलर्स पेढीचे व्यवस्थापक नंदकिशोर विधाते (रा.दौंड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.

याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती अशी की,दि.२ ऑक्टो.रोजी हॉटेल सिटी इन परिसरात ही घटना घडली असून, फिर्यादी हे आपल्या दुकानाचे ६२ तोळे सोन्याचे बनविलेले दागिने घेऊन पुण्याहून दौंडला आले होते.फिर्यादी सोबत त्यांचे नातेवाईक होते. म्हणून दौंडला आल्यावर फिर्यादी यांनी आधी नातलगाला येथील फॉरेस्ट ऑफिस परिसरात असणाऱ्या मालकाच्या बंगल्यावर सोडले व दुचाकीवर सोन्याच्या दागिन्यांची असलेली बॅग घेऊन ते रत्नत्रय ज्वेलर्स या आपल्या दुकानाकडे निघाले असता रस्त्यामध्ये चोरट्याने दुचाकीवरील सोन्याच्या दागिन्यांची असलेली बॅग लंपास केली.शहरातील वर्दळीच्या परिसरात सदरची चोरीची घटना घडल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *