भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरातील भादलवाडी अल्पवयीन मुलींवर विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धीरज बापू भंडलकर, वय.२३ वर्षे ( रा.भादलवाडी,ता. इंदापूर,जि.पुणे ) यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात भा.द. वि.कलम ३६३,३५४,५०६, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८,१२,अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम ३ (१),(r),(s), ३ (w),(i) नुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवारी (दि.३०) घडलेल्या या घटनेसंदर्भात पीडित मुलीने स्वतः भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,भादलवाडी येथे घडलेल्या घटनेत संशयित आरोपीने सकाळी पाऊणे सात वाजण्याच्या सुमारास शाळेत निघालेल्या फिर्यादी अल्पवयीन मुलीला भादलवाडी स्टॅण्डवर गाठले. ‘तु एकटी इथे काय करते ? का उभी राहीली आहे ? अशी विचारणा व दमदाटी करत तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून यवत (ता दौंड) येथे नेले. यवत येथील डोंगरावर नेत तिचा विनयभंग केला. सोबतच तिला या घटनेची वाच्यता कुठे केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली असल्याचे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे करीत आहेत.