BIG BREAKING : उजनी संपादित क्षेत्रातून माती चोरी करणे पडले महागात ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्षासह दोघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूजन नेटवर्क…

दौंड तालुक्यातील नायगाव येथील गट क्रमांक.१० उजनी
संपादित क्षेत्रातून एकशे पाच ब्रास माती चोरी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस युवकच्या माजी तालुकाध्यक्षांसह दोघाजणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे दौंड तालुकाध्यक्ष मिलिंद शिवाजी मोरे, मुकेश शिवाजी मोरे,जेसीपी मालक सागर विलास जाधव यांच्यावर खाण व खनिज अधिनियम पर्यावरण अंतर्गत दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.याबाबत
मलठणचे गावचे तलाठी नंदकुमार खरात यांनी फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,नायगाव (ता. दौंड) येथील उजनी संपादित क्षेत्रातून माती चोरी होत असल्याची बातमी दि.२२ जुलै रोजी मिळताच रात्री साडे अकराच्या सुमारास खाजगी वाहनाने मंडल अधिकारी मंगेश नेवसे,तलाठी नंदकुमार खरात, कोतवाल रोहिदास कांबळे, पोलीस पाटील प्रभाकर पालेकर यांनी पाहणी केली असता आरोपी हे उजनी संपादित क्षेत्रातून माची चोरी करत असल्याचे आढळून आले आहे. सदरील गट क्र.१० मधून माती चोरी केलेल्या खड्डयाचे पंचनामे यामध्ये एकशे पाच ब्रास माती चोरी केल्यामुळे शासकीय नियमानुसार तीन लाख पंधरा हजार रुपये दंडाची करावाई केली आहे.याप्रकरणी पुढील तपास दौंड पोलिस करीत आहेत.या कारवाईमुळे परिसरातील माती चोरांचे धाबे दणाणले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *