BIG BREAKING : अरे बापरे…! मंत्र्याच्या जवळच्या मित्राच्या घरातच सापडला नोटांचा साठा..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी वाचून तुम्ही देखील थक्क व्हाल. कारण पश्चिम बंगालमध्ये एका मंत्र्याच्या जवळच्या मित्राच्या घरात चक्क नोटांचा मोठा साठाच ईडीला सापडला आहे.तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळच्या एका मित्राच्या घरी ईडीने आज छापा टाकला. यावेळी घरात पैशांचा मोठा साठाच ईडीला सापडला.ही कारवाई अनेक तास सुरु होती. तर यावेळी ईडीने तब्बल २० कोटी रुपयांची रोकड जप्त केली असल्याचे सांगण्यात येत आहे.माहितीनुसार, अर्पिता मुखर्जी यांच्या घरी ही रक्कम सापडली आहे. ईडीचे अधिकारी ही २० कोटी रुपयांची रक्कम मोजण्यासाठी मशीन आणि बँक अधिकाऱ्यांची मदत घेत आहेत.

याबरोबरच अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० पेक्षा जास्त मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत.तर आता अर्पिता मुखर्जी यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार असून हा एवढा पैसे नेमकं कुठून आला? यामध्ये आणखीन कोण-कोण सामील आहे ? अशा सर्व अनुषंगाने ईडी याबाबतचा अधिक तपास करणार आहे. दरम्यान,पश्चिम बंगालमध्ये एका मंत्र्याच्या जवळच्या मित्राच्या घरातच नोटांचा साठा सापडल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे, तर पश्चिम बंगालमध्ये या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *