Pune Crime : गुन्हे शाखेकडून तब्बल २५ लाखांचा गुटख्याचा मुद्देमाल हस्तगत..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

विक्रीसाठी नेला जात असलेला २५ लाखांचा गुटखा व टाटा झेनॉन योद्धा गाडी(एमएच.१२ आर.एन.६७०३) गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने जप्त केली.याप्रकरणी प्रकाश प्रेमाराम भाटी,वय.३३ वर्षे (रा.कात्रज कोंढवा रोड,पुणे) याला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.२) मुंढवा हडपसर रोडवरील नोबेल हॉस्पिटल जवळ करण्यात आली.

खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांना मुंढवा हडपसर रोडवरुन एका टाटा झेनॉन योद्धा गाडीतून शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य पान मसाला गुटख्याची विक्री करण्यासाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नोबेल हॉस्पिटल परिसरात सापळा रचून प्रकाश भाटी याच्यासह गाडी ताब्यात घेतली.गाडीची तपासणी केली असता प्रतिबंधीत गुटखा आढळून आला.पोलिसांनी गुटखा व इतर असा एकूण २५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.आरोपी भाटी विरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगने,पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार चेतन शिरोळकर,प्रदिप शितोळे,राहुल उत्तरकर,विनोद साळुंखे,अनिल मेंगडे, शैलेश सुर्वे,विजय गुरव,संग्राम शिनगारे,सैदोबा भोजराव, प्रदिप गाडे,सचिन अहिवळे, अमोल पिलाने,किशोर बर्गे, रवी सपकाळ,महिला पोलीस कर्मचारी आशा कोळेकर रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *