Big Breaking : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार : देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत माहिती आज सायंकाळी शपथविधी..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकारला सुरूंग लागवल्याने गेले आठ दिवस महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून गेले होते.काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर या सर्व नाट्यावर पडदा पडला.आज दुपारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सागर या निवासस्थानी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व नंतर राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले.

आज सायंकाळी सात वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती देवेंद्र फडवणीस यांनी दिली असून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील भारतीय जनता पार्टीचा शिंदे यांना पाठिंबा असून आज संध्याकाळी ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. असे पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजपची युती केल्याने एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडावी, अशी विनंती केली तरी, उद्धव ठाकरे यांनी ती गांभीर्याने घेतली नाही, म्हणून आम्ही आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतली आहे. भाजपा हा आपला खरा मित्र आहे, असे त्यांचे म्हणणे असल्याने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जवळपास ५० आमदारांचा एक गट सत्तास्थापनेत भाजपाला साथ देणार, हे स्पष्ट झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *