Crime News : महिलेवर अत्याचार करत तब्बल ८८ लाखांची केली फसवणूक ; एकाला पोलिसांनी घेतले अटक..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

महिलेवर अत्याचार करत आर्थिक फसवणूक करणाऱ्या तथाकथित समाजसेवकाला एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे.मॉरिस नरोना उर्फ मॉरीश भाई असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.मॉरिश भाईने पीडितेवर बलात्कार करत तिची ८८ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो परदेशात पळून गेला होता.मात्र काल रात्री तो मुंबईत परतताच मुंबई विमानतळावर पोलिसांनी त्याला अटक केली.आरोपीने आणखी किती महिलांवर अत्याचार आणि आर्थिक फसवणूक केली आहे, याबाबत एमएचबी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुंबईतील बोरिवली वेस्ट आयसी कॉलनी येथे समाजसेवक मॉरिस नरोना उर्फ मॉरीश भाई हा राहतो. आरोपीने एका महिलेची ८८ लाखांची फसवणूक केली.तसेच पीडितेवर बलात्कारही केला. एवढेच नाही तर पीडित हिचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची, तसेच पीडितेसह तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत होता.याप्रकरणी महिलेने आरोपीविरोधात एमएचबी पोलिसात तक्रार दाखल केली होती.मात्र आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी परदेशात पळून गेला.काल रात्री तो परदेशातून भारतात दाखल मुंबई विमानतळावर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *