Baramati Crime : मोरगावमधील शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार ;एकावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

मोरगाव येथील मयुरेश्वर विद्यालयातील प्राथमिक शाळेतील अल्पवयीन शाळकरी मुलीला जबरदस्तीने दुचाकी बसवून,जेजुरी येथील लॉजवर घेऊन जात जबरदस्तीने कपडे काढून अश्लील फोटो व व्हिडिओ काढत लैंगीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, याप्रकरणी संशयित आरोपी प्रदिप बाळासो शिंदे ( रा.तरडोली ता.बारामती,जि.पुणे ) याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३६३, ३७६,५०६ बाललैंगीक कायदा कलम ४,१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या घरच्यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.महिलांवर व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अशातच सिद्धेश्वर निंबोडी मधील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच,बारामती तालुक्यातील मोरगाव मधील शाळकरी अल्पवयीन मुलीला जेजुरी या ठिकाणी लॉजवर घेऊन जात,अर्धनग्न अवस्थेत फोटो व व्हिडिओ काढत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत कोणाला काही सांगितले तर फोटो व व्हिडिओ सर्वांना पाठविल अशी धमकी दिली असे फिर्यादीनी फिर्यादीत महंटले आहे.याबाबत आधीक तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *