सहा.पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक सागर आरागडे यांचा धडाका कायम…
फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
फलटण तालुक्यातील गुणवरे गावचे हद्दीत एकाच्या राहत्या घरात पत्त्याकच्या जुगाराचा डाव खेळणाऱ्या चौघांना फलटण ग्रामीण पोलीस ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम महाराष्ट्र जुगार अधिनियम ४, ५, १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत संशयित आरोपी नागेश दिपक कुराडकर,वय.२७ वर्षे, सुनिल राजू कुराडकर,वय.३० वर्षे, सुनिल शंकर आढाव,वय.५१ वर्षे, बापू राजाराम जंगम,वय.२४ वर्षे, बाबासो भिमा कुराडकर,वय.४० वर्षे ( सर्व रा.गुणवरे,ता.फलटण ) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,गुणवरे गावाच्या हद्दीत बापु राजाराम जंगम याच्या राहत्या घरी चौघेजण तीन पानी पत्त्याचा जुगाराचा डाव खेळत असलेच्या माहीत मिळाल्याने या अड्डयावर छापा टाकला असता,जुगार खेळत असलेल्या डावाच्या ठिकाणी पत्त्याची पाने व रोख रक्कम ८४३० व इतर साहित्य मोबाईल १४,००० किंमतीचे असे एकुण रोख रक्कम व साहित्य असे मिळून २२,४३० रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक सातारा अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा अजित बोऱ्हाडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पोलीस धन्यकुमार गोडसे,सहा.पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे,पोलीस कर्मचारी सुधाकर सुर्यवंशी,बबन साबळे,अभिजीत काशिद,दिपाली अलगुडे व महेश जगदाळे यांनी केली आहे.