मोठी बातमी : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलात मोठी खांदेपालट ; बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहितेंसह ७८ अधिकाऱ्यांच्या होणार लवकरच बदल्या..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज्यातील डीसीपी तथा एसपी, डीआयजी आयजी आणि अँडिशनल डीजी या हुद्यांवरील आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये नुकताच मोठा खांदेपालट करण्यात आला.त्यानंतर आता ७८ डीसीपी तथा एसपी, अॅडिशनल एसपी या राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.कोरोनाने रखडलेल्या या बदल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच राज्य सरकार करणार आहे.

दोन वर्षांची टर्म पूर्ण केल्याने या बदल्या केल्या जाणार आहेत. अधिकाऱ्यांच्या पसंतीनुसार त्या होणार आहेत, त्यासाठी त्यांना बदलीच्या तीन ठिकाणांचा पसंतीक्रम विचारण्यात आला आहे.येत्या १८ मे पर्यंत त्यांना तो मेलव्दारे डीजीपी ऑफिसला कळविण्यास राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (आस्थापना) संजीवकुमार सिंघल यांनी सांगितले आहे.

या बदल्या याच महिन्यात होणार आहेत,त्यात पिंपरी चिंचवड मधील डीसीपी (परिमंडल तथा झोन दोन) आनंद भोईटे, पुण्यातील पौर्णिमा गायकवाड (झोन तीन),नम्रता पाटील-चव्हाण,राहुल श्रीरामे (डीसीपी ट्रॅफिक),सागर पाटील (झोन दोन) आणि पुणे ग्रामीण मधील मिलिंद मोहिते (अॅडिशनल एसपी, बारामती) यांचा नंबर लागणार आहे.

बदल्या होणारे इतर काही अधिकारी:

पोर्णिमा चौगुले आणि विजय खरात : डीसीपी नाशिक

दीपाली घाटे,वैशाली कडूकर आणि बापू बांगर डीसीपी, सोलापूर

गजानन राजमाने : डीसीपी, नागपूर

दीपक गिर्हे : डीसीपी झोन एक, औरंगाबाद

विक्रम साळी : डीसीपी,अमरावती

तिरुपती काकडे : अॅडिशनल एसपी, कोल्हापूर

खंडेराव धर्मे : अॅडिशनल एसपी, यवतमाळ

जयश्री जाधव अॅडिशनल एसपी, गडहिंग्लज, कोल्हापूर

सुनील लांजेवार : अॅडिशनल एसपी, बीड

विक्रांत देशमुख : अॅडिशनल एसपी, जालना

बजरंग बनसोडे : अॅडिशनल एसपी, बुलडाणा

अनिकेत भारती: अॅडिशनल ,भंडारा

चंद्रकांत खांडवी: अॅडिशनल एसपी, मालेगाव, नाशिक

जयश्री देसाई : अॅडिशनल एसपी, रत्नागिरी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *