Crime News : स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला दुचाकीसह केले अटक..तपासात दोन चोरीचे गुन्हे उघड !!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

सासवड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या २५ ग्रॅम असलेले मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून,रोहित किशोर मन्नावत,वय.१८ वर्षे ( रा.वढू बुद्रुक )असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर सासवड आणि लोणी काळभोर याठिकाणी देखील जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,सासवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मंगळसूत्र चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव करीत असताना,त्यांना गोपनीय माहिती मिळाली की,हा चोरीचा गुन्हा हा वढू येथील रोहित मन्नावत व त्याच्या साथीदाराने केला असल्याची माहिती मिळाली असता, यावरून स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत वढू येथून KTM गाडीसह ताब्यात घेतले.त्याच्याकडे चौकशी केली असता,त्याच्याकडे मिळालेली KTM गाडी ही सासवड येथील गुन्ह्यात वापरल्याचे कबूल केले.आरोपीला ताब्यात घेत,अधिक तपास केला असता,त्याने त्याच्या साथीदारासह सासवड येथील व लोणी काळभोर या ठिकाणी दोन्ही गुन्हे केले असल्याचे सांगितले.आरोपीला तपासासाठी सासवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,भोर विभागाचे पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार अतुल डेरे, पोलीस नाईक अमोल शेडगे,बाळासाहेब खडके,पोलीस कर्मचारी धिरज जाधव,दगडू विरकर,महिला पोलीस कर्मचारी पूनम गुंड तसेच सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश पोटे यांनी केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *