बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणी जेलमध्ये असलेले वकील गुणरत्न सदावर्ते नाव अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत.सध्या ते साताऱ्याच्या जेलमध्ये आहेत.ह्या सगळ्या घडामोडी होत असताना सदावर्ते यांच्या मुलीचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल होतो आहे. या
व्हिडिओमध्ये सदावर्ते यांची अल्पवयीन मुलगी ही गाडी चालवत आहे.
जो व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे त्यामध्ये गुणरत्न सदावर्ते हे कडेच्या सीटवरती बसले आहेत आणि त्यांची अल्पवयीन मुलगी झेन सदावर्ते ह्या फॉर्चुनर ही गाडी चालवत आहेत.या मुलीचं वय १२ ते १५ वर्षाच्या आसपास आहे.स्वतः गुणवंत गुणरत्न
सदावर्ते हे आपल्या मुलीचा गाडी चालवत असतानाचा व्हिडिओ काढत आहेत.माझी मुलगी झेन ठाणे ते दादर हायवे वर पहिल्यांदा फॉर्म्युनर ही गाडी चालवत आहे असं म्हणत ते झेन चालवत असलेल्या गाडीचा नंबर देखील या व्हिडिओमध्ये सांगत आहेत.
याप्रकरणी बारामती मधील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ट्विटर वरून ट्विट करत गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीचा हा व्हिडीओ ट्विट केला आहे.त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की,”आपल्या
अल्पवयीन १२ वर्षाच्या मुलीला लायसन्स नसतानाही हायवेवर गाडी चालवण्यास देवुन इतरांचे जीवीतास धोका निर्माण करणार्या गुणरत्न सदावर्ते व गाडीमालक जयश्री पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा – नितीन यादव
बारामती मधील या व्यक्तीने हा व्हिडिओ पोस्ट करत,
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील त्याचबरोबर महाराष्ट्र
पोलीस,ठाणे पोलीस यांना टॅग करत गुणरत्न सदावर्ते वगाडी मालक जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल
करावा अशी मागणी देखील केली आहे.
यासोबत गाडीचा इन्शुरन्स संपला असल्याने वाहन कायदा अधिनियमानुसार शासनाने गाडी जप्त करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केली आहे.