Sanjay Raut Big Breaking : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ED चा दणका..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क …

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे. ही ईडीची मोठी कारवाई मानली जात आहे. ईडीनं राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील दादर येथील संपत्ती जप्त केली आहे.

ईडीकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाया सुरू असतानाच, गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. राऊत यांची अलिबाग येथील मालमत्ता आणि दादर येथील मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील फ्लॅटवर ईडीनं टाच आणली आहे. ही आतापर्यंतची ईडीची सर्वात मोठी कारवाई आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *