Big Breaking : रविराज तावरे गोळीबार प्रकरणात अखेर माळेगावचे माजी सरपंच जयदीप तावरे यांना जिल्हासत्र न्यायालयाने केला जामीन मंजूर..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

माळेगाव येथील जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्या गोळीबार प्रकरणात गेल्या चार ते पाच महिन्यापासून कोठडीत असलेल्या माळेगावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सरपंच जयदीप तावरे यांना आज मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

मोक्का न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान संशयित आरोपी जयदीप तावरे यांची बाजू ऍड.सचिन वाघ यांनी मांडली. दरम्यान हा जामीन नामंजूर करू नये,यासाठी
युक्तिवाद केला होता.मात्र वाघ यांनी मोक्का जामीन आणि कलम १६९ चा रिपोर्ट याबाबी वेगवेगळ्या असून यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले असल्याने जामीन मंजूर करण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *