Pandharpur Breaking : ‘परत शेतकऱ्याच्या जन्माला येणार नाही,असे म्हणत’,विष प्राशन करत तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या..!!


पंढरपूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

कोरोनाने अधिक शेतकरी हैराण झाला असून,राज्य सरकारकडून देखील शेतकऱ्यांची हेळसांड होत असल्याची धक्कादायक घटना समोर येत असून,पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील तरुण शेतकरी सुरज जाधव याने विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली असून,विष प्राशन करतानाचा त्याने शेतकऱ्यांच्या व्यथा सांगत स्वतःचा व्हिडिओ व्हायरल केला असून,या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारा दरम्यान पंढरपूरच्या सामान्य रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये तरुण शेतकरी आपल्या व्यथा सांगताना म्हणत आहे की,शेतकऱ्याच्या जन्माला आपण परत कधीच येणार नाही.आपलं आयुष्य इथ पर्यंतच होतं.इथून पुढे आयुष्य नाही. शेतकरी नामर्द आहे.त्यामुळे शेतकऱ्याच्या जन्माला आपण येणार नाही.सरकार कधी शेतकऱ्याच्या नादाला लागत नाही. सरकार शेतकऱ्याचा कधी विचार करत नाही”,अस म्हणत त्याने विषारी औषध प्राशन केले.या घटनेची माहिती मिळताच त्याला पंढरपूरच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र, तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *