बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यातील निरावागज येथील देवकाते कुटुंबातील व्यक्तीचे जमिनीचा दावा चालू असताना, एकमेकांच्या जागेतून जाता येताना एकमेकांची अडवणूक होत होती.त्याबद्द्ल बारामती तालुका पोलिस स्टेशन येथे एकमेकांविरुद्ध तक्रारी पण दाखल आहेत. १३ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० च्या दरम्यान प्रियंका देवकाते व त्याच्या कुटुंबातील व्यक्ती रस्त्याने जात असताना त्यांची त्याठिकाणी अडवणूक झाली.त्यातच प्रियंका देवकाते हिने शिवीगाळ व मारहाण होऊ लागल्याने स्वतःच्या मोबाईलवरून व्हिडिओ चित्रीकरण केले.
त्यामध्ये आदिवासी पारधी समाजाची नाहक बदनामी व समाज्याबद्दल अपशब्द वापरले.आदिवासी पारधी समाजातील कोणत्याही व्यक्तीचा त्या घटनेशी संबंध नसताना व ही घटना देवकाते कुटुंबातील लोकांची, जमिनीच्या वादातील असताना त्यामध्ये आदिवासी पारधी समाजाची त्याठिकाणी बदनामी करण्यात आली. आदिवासी पारधी परिवर्तन परिषेदेचे राज्य समन्वयक आनंद काळे यांनी या घटनेची दखल घेऊन राज्य मानवी हक्क आयोग अनुसूचित जाती जमाती आयोग आदी मान्यवराना निवेदनाची प्रत पाठवून आरोपीवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्या अंतर्गत विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.
सदर घटनेत उषा बाळासाहेब देवकाते,राणी शिवाजी देवकाते तृप्ती शिवाजी देवकर,रुचिता शिवाजी देवकाते, बाळूबाई पोपट देवकाते,जानकी गणेश देवकाते रणजित पांडुरंग देवकाते,निखिल शिवाजी देवकाते,अभिजित बाळासो देवकाते,महादेव साहेबराव देवकाते सर्वजण रा.मुरूम आळी,देवकाते वस्ती,निरावागज,ता.बारामती जि.पुणे ) येथील रहिवासी असून,वरील व्यक्तीवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा आदिवासी पारधी परिवर्तन परिषेदेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा गर्भित इशारा आदिवासी पारधी परिवर्तन परिषेदेचे राज्य समन्वयक आनंद काळे यांनी दिला.