महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सांगलीत नाकाबंदीवेळी एका इनोव्हा कारमध्ये ६३ लाख ५० हजाराची रोकड सापडली आहे. चौकशीसाठी इनोव्हा कारसह ६३ लाख ५० हजारांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. विश्रामबाग पोलीसांच्या नाकाबंदी दरम्यान ही रोकड सापडली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात १०० फुटी परिसरात नाकाबंदी दरम्यान एका इनोव्हा कारची झडती घेतली असता यामध्ये ६३ लाख ५० हजारांची रोकड आढळून आली.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी रकमेबाबत विचारणा करता इनोव्हामध्ये असणाऱ्या व्यक्तीकडून समाधानकारक उत्तर आले नाही.त्यामुळे इनोव्हा कारसह रोकड ताब्यात घेतली. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांनी याबाबत इन्कम टॅक्स विभागाला बोलावून या रकमेबाबत माहिती दिली.अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.