मुंबई : महाराष्ट्र टुडे लाइव्ह न्यूज नेटवर्क…
डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणून पदोन्नती झाली आहे.ते आता गृहरक्षक दलाचे महासंचालक म्हणून काम पाहतील. डॉ.उपाध्याय सध्या अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक या विभागांमध्ये कार्यरत होते. महाराष्ट्र शासनाने त्यांची पदोन्नती जाहीर करून गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या सोबतच कुलवंतकुमार सरंगल यांचीही पदोन्नतीने बदली झाली आहे.डॉ.उपाध्याय हे पोलीस प्रशासन सेवेतील एक स्वच्छ प्रतिमेचे कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून परिचित आहेत. पंढरपूर,मुंबई,नागपूर,औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्याची अवीट छाप उमटवली आहे.