Big Breaking : राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील कोरोना पॉझिटिव्ह..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना कोरोना लागण झाली आहे.आज त्यांनी स्वतःत्यांच्या फेसबुक पेज वरून याची माहिती दिली आहे.या पूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांचे कुटुंब कोरोना बाधित आढळून आले होते.मुंबईत झालेल्या हर्षवर्धन पाटील यांची कन्या पुणे जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांचा ताज पॅलेसमधील विवाह सोहळ्यात सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटील दोघेही उपस्थित होते.

या सोहळ्यास राज्यभरातील माजी मंत्री व प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.सुरक्षेच्या कारणास्तव हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या चाचणीमध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *