Crime News : विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल..!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

दौंड तालुक्यातील गिरिम गावातील विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर दौंड पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३०६,४९८ (अ),३२३,५०६ (३४)अन्वये गुन्हा दाखल केला आहे.विठ्ठल दादा फुलारी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असुन
यामध्ये पती,सासू,सासरे व दीर यांचा समावेश आहे.जीवन माणिक कोळपे,माणिक राजाराम कोळपे,लता माणिक कोळपे
मनोज माणिक कोळपे सर्वजण (रा.मदनेवस्ती,गिरीम,ता.दौंड, जि.पुणे )अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,फिर्यादींची मुलगी पूर्वा जीवन कोळपे,वय.१९ वर्ष(रा.मदनेवाडी,गिरीम,ता.दौड,जि.पुणे) हिचा पाच महिन्यांपूर्वी जीवन कोळपे याच्याबरोबर विवाह झाला होता.फिर्यादींनी दोन वर्षांपूर्वी मुलीच्या सासरच्या लोकांवरील दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा या कारणासाठी फिर्यादी यांच्या मुलीचा पती, सासू, सासरे व दीर यांनी शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याने,या सासरच्या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेतला घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हणटंले आहे.यामुळे
फिर्यादी यांनी मुलीच्या सासरच्या लोकांविरोधात दौंड पोलिसात तक्रार केली.पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *