पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते.मात्र,उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना
उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात सुरु होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ते ९९ वर्षांचे होते.रविवारी,रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना न्यूमोनिया झाला असून प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली होती.
मात्र,रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली.बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी झाला.त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी,आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जाऊ लागले.जवळपास सात दशके त्यांनी इतिहास
संशोधनाचे कार्य केले.राज्य सरकारने त्यांना सन २०१५ मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव
केला होता.बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला होता.इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.बाबासाहेब पुरंदरे यांनी
शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत.