जेजुरीचे सुनील महाडिक बारामतीचे नवे पोलीस निरीक्षक …नामदेव शिंदेंची नियंत्रण कक्षात बदली…!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

बारामती शहरातील दबंग पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांची नियंत्रण कक्षात तडफडी बदली करण्यात आली आहे.आणि त्यांच्या जागेवर जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे आज बारामती शहर पोलीस ठाण्याचा चार्जे घेणार असल्याचे माहिती मिळाली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यानंतर नामदेव शिंदे यांनी पहिल्यांदा बारामती मधील बड्या सावकारांवर गुन्हा दाखल केल्यानंतर बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली होती, असे असताना नामदेव शिंदे यांची बदली अचानक का झाली ? अशी चर्चा आता बारामती परिसरात रंगू लागले आहे.

बारामती शहरांमध्ये शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांना लगाम लावला होता,तसेच पोलीस ठाण्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत शहर पोलीस ठाण्याचा कायापालट केला होता,असे असताना नामदेव शिंदे यांची अचानक बदली झाल्याने नेमके बदलीचे कारण काय ? असा प्रश्न बारामतीकरांना पडला आहे..बारामती शहरात अतिशय चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली अचानक होते हादेखील प्रश्न आता बारामतीकरांना सतावत आहे.असो मात्र बदलीचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे…नक्की ह्या गुलदस्त्यातुन काही वेगळा प्रकार बाहेर येणार का ? अशी चर्चा आता तालुक्यातील नागरिकांत रंगली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *