फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढवळ गावामध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेली असल्याची माहीती ग्रामीण पोलिसांना मिळताच फलटण ग्रामीण पोलीसांनी ढवळ गावांमधील तयार करण्यात आलेला बैलगाडा शर्यतीचा ट्रॅक नेस्तनाबूत करून टाकलेला आहे.या कारवाईमध्ये बैलगाडा किंवा बैलगाडा चालक किंवा इतर इसम आढळून आलेले नाहीत.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,फलटण तालुक्याच्या ढवळ गावांमध्ये बैलगाडा शर्यत खेळण्यासाठी ट्रॅक तयार करण्यात आलेला होता.याची माहिती फलटण ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलिसांनी हा ट्रॅक नेस्तनाबूत करून टाकलेला आहे.ढवळ गावांमध्येच असणाऱ्या जेसीबी लावून या ट्रॅकवर मोठाले खड्डे काढून बैलगाडा शर्यतीचे आयोजन तेथे करता येणार नाहीत अशा रीतीने हा ट्रॅक नेस्तनाबूत करून टाकण्यात आलेला आहे.ही कारवाई फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार घोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस कर्मचारी शिंदे,राऊत,जगदाळे,कुंभार,तुपे, जाधव,पाटोळे,कदम मॅडम आणि पेंदाम यांनी केलेली आहे.