दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
सध्याचे महाराष्ट्रातील राजकारण पाहता या राजकारणात उजपोह होताना दिसून येत आहे.यातच दौंडमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले असून,राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते बादशाह शेख यांनी पक्षात खासदार सुप्रिया सुळे आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्याकडून आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे, यामुळे दौंड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सच्च्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्याने भविष्य काळात बादशाह शेख नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे..??
बादशाह शेख यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडत,मा.आमदार रमेश थोरात यांच्यासारखा खोटारडा माणूस मी माझ्या राजकीय कारकिर्दीत पाहिलेला नाही,माझ्या समर्थकांची माझ्या सहकारी नगरसेवकांशी चर्चा करून पुढे नेमके काय करायचे हे ठरविणार असल्याचेही बादशाह शेख यांनी सांगितले.बादशाह शेख हे गेल्या ३० ते ३५ वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कार्य करत होते,ज्या पक्षासाठी मी रस्त्यावर उतरून काम केले पक्षासाठी मोगली आणि असे असताना प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत राहिलो.जर प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्षात अपमान होत असेल तर वेळ पडली तर,घरी बसणार परंतु,अपमानित होऊन राजकारण करणार नाही.अशी खंत बादशाह शेख यांनी व्यक्त केली.
मध्यंतरीच्या काळात दौंड शहरात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मी शहरातील पक्षाच्या परिस्थिती बाबत सत्य सांगण्याचे धाडस केले,मात्र माझ्या या भूमिकेचा खासदार सुप्रिया सुळे यांना राग आला,मा.आमदार रमेश थोरात यांनी मला पुढे बोलू दिले नाही. दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सच्चा कार्यकर्त्याला किंमत राहिलेली सुन चमचेगिरी व हुजरेगिरी करणार्या पदाधिकार्यांची पक्षाला गरज असल्याची,आणि त्यामुळे मी हा माझा अपमान आहे,असे समजून दौंड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत पक्षाबरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला आहे असे खळबळजनक विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरपालिकेतील गटनेते बादशाह शेख यांनी केले आहे.