सातारा : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
मानसिक व शारीरिक त्रास देत, एका महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू आणि पतीवर गुन्हा दाखल झाला आहे.सासू सुवर्णा खांडेकर आणि पती गणेश खांडेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.दरम्यान,आत्महत्या
करणाऱ्या महिलेचे नाव शुभांगी गणेश खांडेकर (वय.२६,रा. ५८७, मंगळवार पेठ,सातारा) असे आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,सविता सुनील मळेकर (वय ४०,रा.सर्वे नं.२४, बोपोडी,पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,त्यांची मुलगी शुभांगी यांचा विवाह गणेश विष्णू खांडेकर याच्याशी झाला आहे.
मात्र,दोन दिवसांपूर्वी त्यांना माहिती मिळाली की त्यांची मुलगी शुभांगी यांनी तिच्या मंगळवार पेठेतील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली आहे.त्यामुळे त्या पुण्यातून सातारा येथे आल्या असता शुभांगी यांनी गळफास लावून आत्महत्या केली असल्याची त्यांची खात्री झाली.यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात येत,तक्रार दिली आणि पती गणेश विष्णू खांडेकर आणि सासू सुवर्णा विष्णू खांडेकर (रा.५८७,मंगळवार पेठ, सातारा)या दोघांकडून शुभांगी हिला शारीरिक व मानसिक त्रास दिल्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचा आक्षेप घेतला आहे.या तक्रारीनंतर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गणेश आणि सुवर्णा या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान,घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तपासाबाबत अधिक सूचना केल्या.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करीत आहेत.