गावठी रिव्हॉल्व्हरसह काडतुसे बाळगणाऱ्या सराईत आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात….!!


धनकवडी : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

गावठी रिव्हॉल्व्हरसह काडतुसे जवळ बाळगणाऱ्या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून
त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल,काडतुसे,पितळी धातूची ४,एक काळ्या रंगाची एअर गन, देशी बनावटीचा गावठी कट्टा, अशी प्राणघातक हत्यारे व मोटार सायकलसह ८९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.यामध्ये सौरभ रामचंद्र सोळसकर ( वय.२२,रा.रजनी कॉर्नरशेजारी, बालाजीनगर),शुभम आया कसबे (वय.२१,रा.खोपडेनगर,गुजर- निंबाळकरवाडी),दत्तात्रय राजाराम पाटोळे (वय.१९,रा. खोपडेनगर,गुजर निंबाळकर वाडी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकांचे अधिकारी अंकुश कर्पे व तपास पथकाचे कर्मचारी हद्दीमध्ये रात्रगस्त करत असताना कात्रज परिसरातील नारायणीधाम मंदिराजवळ एक विना नंबरच्या दुचाकी गाडीवर तीन इसम संशयास्पदरीत्या आढळून आले.

तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकले असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले.तपास पथकाने त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी सौरभ सोळसकर याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व पितळी धातूची २ काडतुसे आरोपी शुभम कसबे यांचेकडे एक देशी बनावटीचा गावठी कट्टा व पितळी धातूची २ काडतुसे व आरोपी दत्तात्रय पाटोळे यांचेकर्ड एक काळ्या रंगाची एअरमन अशी हत्यारे मिळून आली.प्राणघातक हत्यारे सापडल्याने तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी ही पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस कर्मचारी अंकुश कर्पे,रविंद्र भोसले,रविंद्र चिप्पा,गणेश सुतार, सचिन पवार,निलेश खोमणे,योगेश सूख,हर्षल शिंदे, अभिजीत जाधव,गणेश शेंडे,राहुल तांबे,धनाजी धोत्रे,नवनाथ खताळ, सचिन गाडे, शिवदत्त गायकवाड,विक्रम सावंत,आशिष गायकवाड, जगदीश खेडकर यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *