BIG BREAKING | माळेगाव येथे महिला पत्रकाराला जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी; राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह ७ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल…


माळेगाव : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..( संपादक : विकास कोकरे )

बारामती तालुक्यातील ​माळेगाव नगरपंचायत कार्यालयासमोर एका महिला पत्रकाराला तिच्या जातीवरून जातीवाचक बोलून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्थानिक नगरसेवकांचाही समावेश असल्याने बारामती तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.​याप्रकरणी युट्युब पत्रकार श्रीमती रणदिवे (वय ३२, रा. माळेगाव बु||,ता.बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार आरोपी केदारी (पूर्ण नाव माहीत नाही), गाळा मालक, प्रांजली सचिन येळे,जयश्री बाळासाहेब तावरे, वृशाली राहुल तावरे,दिपाली अनिकेत बोबडे आणि जयदीप दिलीप तावरे (सर्व रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ही घटना २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास माळेगाव नगरपंचायत कार्यालयासमोर असलेल्या ‘श्री साईच्छा इडली सेंटर’ येथे घडली.फिर्यादी रणदिवे या अनुसूचित जाती जमातीच्या असल्याचे माहीत असतानाही,आरोपींनी त्यांना वेळोवेळी त्यांच्या जातीवरून अश्लील भाषेत शिवीगाळ केली,तसेच जाहीर ठिकाणी अपमानित करून दमदाटी केली.​या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिला पत्रकाराने माळेगाव पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून,या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.

राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या गुन्ह्यामुळे माळेगाव परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून,पोलीस पुढील कारवाई काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *