BIG NEWS | दहा वर्षे कंपनीत पाय ठेवला नाही; राष्ट्रवादीच्या विचाराच्या पॅनेलला केलं चारी मुंड्या चित…


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती एमआयडीसीमधील श्रायबर डायनामिक्स डेअरीची एम्प्लॉईज युनियनची निवडणूक दि.3 जाने रोजी पार पडली.या निवडणुकीत डायनामिक्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग कचरे यांच्या नेतृत्वाखालील कामगार विकास पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.पांडुरंग कचरे यांनी गेल्या दहा वर्षापासून कंपनीत पाय देखील ठेवला नसताना देखील कामगार वर्गांनी कचरे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या पॅनेलवर विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या पॅनेलला चारी मुंड्या चित केले.

यावेळी श्रायबर डायनामिक्स डेअरिज कामगार युनियनच्या अध्यक्षपदी विजय सस्ते यांची तर उपाध्यक्षपदी मयूर शिंदे
यांची निवड करण्यात आली.नुकत्याच झालेल्या निवडणूकीत संस्थापक अध्यक्ष पांडुरंग कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार विकास पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले होते.यामध्ये कार्याध्यक्षपदी गणेश सोनावणे,सरचिटणीसपदी राजेंद्र कोळेकर, सहचिटणीसपदी गोकुळ मदने आणि दादाराम पोंदुकले, कोषापालपदी राजेंद्र तरंगे,सह कोषापालपदी अनिल भालेराव यांची निवड करण्यात आली..

या पदावरील उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले.युनियनचे अध्यक्ष विजय सस्ते व सर्व उमेदवार यांनी कामगारांचे आभार व्यक्त केले.अनेक अडचणीवर मात करून कामगारांनी या पॅनलवर जो विश्वास दाखवला आहे त्यास कोणताही तडा जाऊ दिला जाणार नाही.भयमुक्त वातारणात विकासाचा नवा अध्याय सुरू करून कंपनी व कामगारांचे हित साध्य करणे,तसेच सर्वांच्या सहकार्याने काम करू कोणत्याही कामगारांवर अन्याय होणार नाही.निवडून आलेले उमेदवार कामगारांना दैवत म्हणून काम करतील आपला परका न मानता सर्व कामगारांना बरोबर काम करतील.सर्व कामगार बंधू यांनी अत्यंत मोठी जबाबदारी दिली आहे पूर्ण क्षमतेने पार पाडू असे युनियनचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी कामगारांना आश्वासित केले..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *