BIG BREAKING : एमआयडीसीमध्ये कॅफेत चालले होते अल्पवयीन मुला मुलींचे अश्लिल चाळे;अखेर तालुका पोलिसांनी कॅफे मालक सुहास कदमसह मॅनेजवर केला गुन्हा दाखल…


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

बारामती एमआयडीसी परिसरातील सुरू असलेल्या
ग्राउंड अप विदया कॉर्नर बारामती कॅफेमध्ये अल्पवयीन मुला मुलींचे अश्लील चाळे होत असल्याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाला माहिती मिळाल्याने पोलिसांनी अचानक तपासणी करत
बारामतीचे कॅफे मालक सुहास तानाजी कदम व मॅनेजर मयुर बाळु कदम यांच्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला..

याबाबत सविस्तर माहिती अशी की,उपविभागीय कार्यालयातील निर्भया पथकाला नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार कॅफे ग्राउंड अप विदया कॉर्नर बारामती येथे अल्पवयीन मुला-मुलींचे अश्लील चाळे चालत असल्याची माहिती मिळाली असता,बारामती तालुका पोलीसांनी व निर्भया पथक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बारामती यांनी संयुक्त कारावाई करिता कॅफे ग्राउंड अप विदया कॉर्नर बारामती येथील कॅफेची अचानक तपासणी केली असता कॅफेमधील पडदे लावुन पार्टीशन केलेल्या जागेत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुले मुली एकांतात बसुन असभ्य वर्तन व अश्लिल चाळे करत असलेचे आढळून आले. याप्रकरणी तालुका पोलिसांनी कॅफे मालकांवर व मॅनेजरवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली.

ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बारामती,व बारामती तालुका पोलीस स्टेशन यांच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली आहे..

बातमी चौकट :

पालकांनी सुदधा याबाबतीत गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे असुन संबंधित सर्व कॅफे चालकाना नोटिसा बजावण्यात आल्या असुन त्यांनी कॅफेमधील पार्टिशन काढुन नाही टाकले तर त्याचेवरती कठोर कारवाई करण्यात येईल व सदर कॅफेचालकाचे परवाने रदद करण्याबाबतचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे.

प्रभाकर मोरे ( पोलीस निरीक्षक बारामती तालुका )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *