बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क …
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना आमच्या भाषेत उत्तर दिले जाईल असा धमकी वजा इशारा देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.अब्दुल सत्तार यांनी बेताल वक्तव्य करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत.त्यामुळे वतीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सत्तरांचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अब्दुल सत्तरांच्या विरोधात घोषणाबाजी केली.. ५० खोके,एकदम ओके,५० खोके घेऊन माजलेत बोके अशा प्रकारची देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अब्दुल सत्तार हे अनेक पक्ष बदलून ह्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत.त्यामुळे पन्नास खोके एकदम ओके..घेऊनच ते मंत्री झालेले आहेत..म्हणून आशा नीतीभ्रष्ट,असंवेदनशील भाषा असणारी ही घाण मंत्रीमंडळातून बाजूला करावी ही मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी मुख्यमंत्र्यांना व उपमुखमंत्र्यांना बारामतीकरांच्या वतीने केली आहे.