BIG BREAKING : बारामतीच्या विजय मोटे व प्रफुल्ल देवकातेसह एकावर वालचंदनगर पोलीस ठाण्यात सावकारीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..!!


वालचंदनगर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी गावातील तरुणाने व्याजाच्या पैशांसाठी तीन सावकारांनी सातत्याने तगादा लावून मानसिक त्रास दिल्याने सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जावेद अब्बास मुलाणी,वय.३२ वर्षे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत वालचंदनगर पोलिसात मयत तरुणाचा भाऊ नवाज अब्बास मुलाणी यांनी फिर्याद दिली आहे.प्रफुल्ल रघुनाथ देवकाते ( रा.पिंपळी ता. बारामती),विजय मोटे (रा.निरावागज ता.बारामती) व संदिप अरुण भोसले (रा.निमसाखरता, इंदापूर) या तिघांवर वालचंदनगर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३०६,५०६,३४ सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९,४५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जावेद आब्बास मुलाणी यांनी वरील खासगी सावकरांकडून व्याजाने पैसे घेतले होते. दरम्यान, हे सावकार व्याजाच्या पैशासाठी त्याच्याकडे तगादा लावत होते. याशिवाय जावेद यास वारंवार जिवे मारण्याची धमकी देत होते. त्यामुळे या सावकारांच्या त्रासाला कंटाळून जावेद मुलाणी यांनी मंगळवार दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जंक्शन ते कळस रसत्यानजीक असलेल्या पत्र्याच्या शेडमधील लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्त्या केली.आत्महत्त्येपूर्वी मुलाणी यांनी चिठ्ठी लिहून खिश्यात ठेवली होती.या चिट्टी मध्ये वरील तीन सावकारांची नावे आहेत. तपास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरापा लातूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *