Political Breaking : राजकारणात आणखी एका ठाकरे कुटुंबातील सदस्यांची एन्ट्री होणार ?


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

तेजस ठाकरे यांना राजकारणात उतरवा, अशी मागणी युवासेनेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे.युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोशल मीडीयाच्या माध्यमातून ही इच्छा व्यक्त केली आहे.त्यामुळे अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर असणारे तेजस ठाकरे राजकरणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहेत.शिवसेनेत झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या राज्यभर गाठीभेटी सुरू आहेत. त्यामध्ये युवासैनिकांनी तेजस ठाकरेंना आक्रमकरित्या रणांगणात उतरवले पाहिजे, असा सूर धरला आहे.

बाळासाहेबांचे आक्रमक गुण तेजस ठाकरेंमध्ये असल्याचे बोलले जाते.त्यामुळे जंगलात,दऱ्या खोऱ्यांत रंगणारे,फिरणारे तेजस ठाकरे राजकारणाच्या आखाड्यात शड्डू ठोकणार का ? हे पाहावं लागेल.तेजस ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे धाकटे बंधू आहेत. काही मोजक्या राजकीय घटना वगळता तेजस हे राजकारणापासून दूरच आहेत. मात्र, पक्ष संकटात असताना तेजस मैदानात उतरून पक्षाला नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करू शकतात,अशी शक्यता बांधली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *