BIG BREAKING : ठेकेदार व बगलबच्चे जगविण्यासाठी बारामती च्या तथाकथित विकासाचा बागूलबुवा उभा करण्याचे पाप पवारांनी केले असल्याचा भाजपचे जिल्हा सहसंयोजक ऍड.नितीन भामे यांचा आरोप..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आलेलं शिंदे सरकार आता ठाकरे सरकारला धक्क्यावर धक्के देत आहे. ठाकरे सरकारच्या अनेक प्रकल्पांना स्थगिती दिल्यानंतर आता नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.मुख्यमंत्री शिंदेंनी नगरविकास विभागाच्या मार्च ते जून २०२२ मध्ये मंजूर झालेल्या तब्बल ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे.दरम्यान,९४१ कोटींपैकी एकट्या बारामती नगरपरिषदेला २४५ कोटींचं वितरण करण्यात आलं होतं.मात्र आता बारामतीतल्या कामांना स्थगिती मिळाल्याने हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

आणि अशातच शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाचे बारामतीत भारतीय जनता पक्षाकडून स्वागत केले जात असून,बारामतीचा भरकटलेला विकास रुळावर आणण्यासाठी शिंदे सरकारने बारामतीतील २४५ कोटी रुपयांच्या विकास कामांना दिलेल्या स्थागितीच्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करत असून,या अडीच वर्षाच्या काळात कोट्यावधींचा निधी आणून फक्त ठेकेदार जगविण्याचेच काम करण्यात आल्याचा आरोप भाजपचे जिल्हा संयोजक ॲड.नितीन भामे यांनी केला आहे.बारामतीचे नियोजनशुन्य,अकल्पक विकास आराखडे तसेच जनतेच्या पैशाचा अपव्यय करून हुकूमशाही पद्धतीने पवारांकडून बारामतीच्या तथाकथित विकासाचा बागूलबुवा उभा करून कायमच जनतेला भ्रमीत करण्याचं पाप केले असल्याचा आरोप देखील ॲड. नितीन भामे यांनी केला आहे.

तसेच भरकटलेली विकास कामे बारामतीकरांच्या माथी मारण्याचे काम बारामतीची जनता सहन करणार नाही, याचा जाब पवारांना द्यावाच लागेल.जनतेच्या हिताच्या आवश्यक कामांवर परिणाम होणार नाही याची काळजी शिंदे सरकार घेईलच बारामतीतील विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत नविन पालक मंत्री नियुक्त झाल्यानंतर पक्ष पातळीवर तक्रार केली जाईल तसेच ज्या ठिकाणी जनतेच्या हिताची विकास कामे
आवश्यक आहेत तिथे निश्चितच काम सुरू करण्याबाबत
विनंती केली जाईल.

सर्वसामान्य जनतेला अशा कामाचं काहीच कौतुक नाही.अपुर्ण पाणी पुरवठा योजना, शहरातील स्वच्छतेचा कायमचाच प्रश्न,कचरा डेपो प्रश्न, अंतर्गत रस्त्यांची कायमच डागडूजी करावी लागणे, विकास कामांबाबत ढिसाळ नियोजन, पुर्वनियोजनाचा आभाव, झालेली विकास कामे पुन्हा तोडण्याचा निर्णय असे अनेक अविचारी निर्णय मागील अडीच वर्षाच्या काळात झालेत; परंतु केवळ पाशवी बहुमतीच्या जोरावर बारामतीत जनतेची मुस्काटदाबी करून घेतेलेले निर्णय जनतेला मान्य नाहीत, असे नितीन भामे यांनी यावेळी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *