Malshiras News : जनकल्याण बहुजन महासंघ सामाजिक संघटनेची कार्यकारिणी बैठक अकलुज विश्राम ग्रह येथे संपन्न..!!


माळशिरस प्रतिनिधी : धनंजय थोरात

फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा हाती घेऊन जनकल्याण बहुजन महासंघ या सामाजिक संघटनेची कार्यकारणी बैठक संस्थापक अध्यक्ष संतोष खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली अकलूज येथील विश्रामग्रह येथे संपन्न झाली.यावेळी सामाजिक विषयावरती चर्चा करण्यात आली या वेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या असणाऱ्या समस्या पदाधिकाऱ्यांना समोर मांडण्यात आल्या व त्या समस्या वरती मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या कार्यकर्त्यांना पदे देण्यात आली.

यावेळी जनकल्याण बहुजन महासंघ सामाजिक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी रामचंद्र ढोबळे,महिला प्रदेशाध्यक्षपदी संगीता साठे,महिला पश्चिम.म सचिवपदी अनिता साठे,महिला जिल्हाध्यक्षपदी सुनंदा गाडे, तालुकाध्यक्षपदी धनाजी पवळ तालुका महिला अध्यक्ष शबाना पटेल,तालुका महिला उपाध्यक्षपदी कुलकर्णी मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी क्रांतिकारी संघर्ष सेना प्रदेशाध्यक्ष गणेश (भाऊ) भोसले, पत्रकार अमोल भोसले, रोहित साठे आदी मान्यवर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *