Govt.News : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई ; ११.१९ कोटींच्या करचोरी प्रकरणी एकास अटक..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

शासनाचा महसूल ५०.८८ कोटींची खरेदी दाखवून ११.१८ कोटी रुपयांची चुकीची कर वजावट दाखवून बुडविल्या प्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कार्यवाही करुन मे.जातवेदास कंस्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. कंपनीचे संचालक हितेश अमृतलाल पटेल,(४२), घाटकोपर यांना मंगळवार दि.१४ रोजी केली.अन्य दोन संचालक अशोक मेवाणी व नरेंद्र पटेल यांचा शोध सुरु आहे,अशी माहिती महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

महानगर दंडाधिकारी यांनी हितेश पटेल यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईत अन्वेषण – अ मुंबईचे राज्यकर सहआयुक्त राहुल द्विवेदी,राज्यकर उपायुक्त राजेंद्र टिळेकर,संजय सावंत, सहायक राज्यकर आयुक्त संजय शेटे,नामदेव मानकर सहभागी झाले होते.महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत करचोरी प्रकरणी १९ जणांना अटक केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *