Indapur News : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उद्या नीरा नरसिंहपूर दौरा..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या शुक्रवारी (दि.२०) श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर दौऱ्यावरती येत आहेत.यावेळी नीरा नरसिंहपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर दुपारी ४ वाजता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत भव्य स्वागत सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी दिली.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांचे नीरा नरसिंहपूर येथे हेलिपॅडवर आगमन झालेनंतर ते कुलदैवत श्री लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन घेतील.त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कारासाठी भव्य स्वागत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्वागत सभेसाठी नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार व शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी केले आहे. दरम्यान,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *