सातारा : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
लग्नाचे आमिष दाखवून जीवनभर सोबत राहण्याची बतावणी करून संशयित आरोपीने एका महिलेवर वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना घडली आहे.याबाबत पीडित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.याप्रकरणी संशयित आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,दि.२७ जानेवारी २०२१ ते दि.२९ जानेवारी २०२१ या दरम्यान मुंबई येथे वास्तव्य करणाऱ्या एका महिलेला विवाहाचे आमिष दाखवून जीवनभर सोबत राहण्याची बतावणी केली.संशयित आरोपी विकास शामराव जाधव,वय.२८ ( रा.निसर्ग कॉम्प्लेक्स गावडे पेट्रोल पंपाजवळ,गुणवडी रोड ता. बारामती ) याने सातारा येथील केबीपी महाविद्यालयाच्या जवळ असणाऱ्या हॉटेलवर, सातारा बसस्थानक जवळ आणि कास पठार जवळ असणाऱ्या एका रिसॉर्टवर अत्याचार केला. त्याच्याकडे विवाह करण्याबाबत विचारले असता त्याने नकार देऊन तुला काय करायच आहे ते कर,अशी धमकी दिल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.