Political Breaking : यशवंत जाधवांचे ”मातोश्री” चरणी तब्बल ५० लाखांचे घड्याळ आणि २ कोटीच्या भेटवस्तू अर्पण…पण जाधव म्हणतात मातोश्री म्हणजे…!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली होती.त्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचे शिवसेना नेत्यांनी म्हटले होते.

मात्र,याप्रकरणी आता धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे.मात्र या माहितीनंतर आता यशवंत जाधव यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.यशवंत जाधव यांची डायरी आयकर विभागाच्या हाती लागली आहे.या डायरीमध्ये यशवंत जाधव यांनी केलेल्या व्यवहाराच्या काही नोंदी समोर आल्या आहेत. २०१८ ते २०२२ या कालावधीतील या नोंदी आहेत. नोंदीनुसार २ कोटी मातोश्रीला दिले. ५० लाखांचे घड्याळ मातोश्रीला दिले,अशा काही नोंदी या डायरीमध्ये आढळून आल्या आहेत.

मात्र, या डायरीमध्ये मातोश्रीचा असलेला उल्लेख म्हणजे आपली आई असल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले आहे.मात्र,या नोंदींमुळे यशवंत जाधव यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.अतुल भातखळकर म्हणे की, ‘मी या पूर्वीच म्हटले होते.नोकराकडे एवढे तर मालकाकडे किती असतील.

आता मातोश्री म्हणजे माझी आई असं हे सांगत आहेत. पण, संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की, कोण मातोश्री,’ अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली. ‘यशवंत जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच जर आपल्या आईला इतके पैसे आणि महागडे घड्याळ दिले असेल तर धन्य ती माता,’ असा टोला त्यांनी यशवंत जाधव यांना लगावला आहे.

या माहितीच्या आधारे यशवंत जाधव यांची चौकशी व्हावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी ईडीला केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *