Political News : शेर कभी गिधडों की धमकीयों से डरते नहीं, फडणवीसांच राऊतांच्या टिकेला प्रत्युत्तर..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.सिंह कधी गिधाडांच्या धमक्यांना घाबरत नाही,असं विधान फडणवीस यांनी केलं आहे.त्यांनी गोव्यातील पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं आहे.संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर आरोप केले होते.त्यावर उत्तर देत फडणवीस यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. राऊत व्हिक्ट्मि कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत.सिंह गिधाडांच्या धमक्यांना घाबरत नाही असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

फडणवीसांनी पुढे म्हटले आहे की,’मोदींच्या सरकारमध्ये कुणाचाही बळी दिला जातं नाही.राऊतांनी व्हिक्टिम कार्ड खेळणं सोडून दिलं पाहिजे.संजय राऊतांचं वक्तव्य हेडलाईनसाठी आहे.ते संपादक आहेत.कोणत्या वक्तव्याची बातमी होणार हे त्यांना माहिती आहे. त्यामुळेच ते अशी वक्तव्य करतात.’

काल उपराष्ट्रपतींना पत्र लिहित लेटर बॉम्ब फोडणाऱ्या संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्याहून मोठा बॉम्ब फोडला.संजय राऊत म्हणाले की, “केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे.तुम्ही पाहत राहा फक्त याचे सुत्रधार कोण आहेत.याचा नकाब लवकरच उतरवू.बेकायदेशीरपणे ईडी ऑफिसमध्ये जाऊन कोण लोक बसत आहेत आणि ऑपरेट करत आहेत.ईडीच्या कार्यालयात इतरांना प्रवेश नाही ना ? मग हे दोन-तीन लोक,कार्यालयात बसतात.ईडीच्या अधिकाऱ्यांना आदेश देतात.काय करायचंय ? कोणाला बोलवायचं ? कोणाला टॉर्चर करायचं ? मी देवेंद्र फडणवीसांना आव्हान करतोय आणि मला काय सांगायचंय ते त्यांना माहिती आहे.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *