BIG BREAKING : मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटलांच्या पत्नीवर किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप..नांगरेना सेवेतून मुक्त करण्याची केली मागणी..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईचे
पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत,तसेच विश्वास नांगरे यांना पोलीस दलाच्या नोकरीतून मुक्त करा,अशी मागणी देखील किरीट सोमय्या यांनी केली आहे.पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना,किरीट सोमय्या म्हणाले की सध्या जालना साखर कारखान्याचे दोन मालक आहेत. एक खोतकर परिवार आणि दुसरे मुळे परिवार.त्यातल्या एक भागधारक रुपाली विश्वास पाटील या आहेत.विश्वास नांगरे पाटील हे मुबंई पोलीस दलाचे सह आयुक्त आहेत.”

तसेच सोमय्या म्हणाले की,शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी जालना साखर कारखान्याची चौकशी स्टेटमेंट आल्यानंतर महिनाभरात बंद करण्यात आली. मुंबई पोलिसांनी ही सर्व चौकशी बंद करून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला.या सर्व प्रकरणाची एकतर सीबीआय चौकशी करा किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी
करा.”किरीट सोमय्या म्हणाले मुंबईचा एक पोलीस सह आयुक्त बेनामी पद्धतीने साखर कारखाना घेतो.दुसरा पोलीस सह आयुक्त मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेली चौकशी बंद करतो.जून २०१९ मध्ये स्वतः उच्च न्यायालयाने या प्रकरणाचे तपास करण्याचे आदेश दिले होते.या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि तोपर्यंत विश्वास नांगरे पाटील यांना नोकरीतून मुक्त करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *