CRIME NEWS : अपघाताचा बनाव करून लुटणाऱ्या टोळीला ताब्यात घेत, सोन्याच्या बिस्किटासह ४५ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

अपघाताचा बनाव करून लुटणा-या टोळीला ४८ तासाच्या आत सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने व सांगोला पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत,मुसक्या आवळल्या असून,त्याच्या ताब्यातील ४५ लाखांची सोन्याची बिस्किटे हस्तगत करण्यात आली आहे.फिर्यादी सुशांत बापूसो वाघमारे,वय.२२ वर्षे,(रा.दिघंची,ता.आटपाडी,जि. सांगली )यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार सांगोला पोलीस ठाण्यात भादवी कलम ३९४,३९७,२७९ ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादींनुसार त्यांचे मालक विजय काटकर यांनी त्यांना बोलावून घेवून त्यांच्याकडील जुने सोने देऊन,सांगोला येथून ते दागिने गाळून शुध्द करून त्याचे बिस्कीट करून आणण्यास सांगितले असता,फिर्यादी व त्याचा मित्र असे दोघेजण मोटार सायकलवरून सांगोला येथील महाकाली टंचचे दुकानात येवून त्यांना जुने सोने वितळून त्याचे बिस्कीट बनवून घेण्यासाठी गेले होते.सायंकाळी ७:३० च्या सुमारास परत आटपाडी कडे जाताना एकतपूर ते आचकदाणी जाणाऱ्या फॉरेस्टजवळ आले असता,एका अनोळखी इसमाने चारचाकी गाडीत येत,मोटार सायकलला जोराची धडक दिल्याने,काटकर व त्यांचे मित्र चारीत जावून पडल्याने गंभीर जखमी झाले.

त्यानंतर चारचाकी वाहनातून दोघेजण बाहेर येत,काटकरांना हाताने व दगडाने मारहाण करून त्यांच्या जवळील मोबाईल फोन काढून घेत,त्यांच्या खिशात असलेले सोन्याचे बिस्कीट जबरदस्तीने काढून घेत, वाहन पेटवून देवून निघून गेले.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून, तपास सुरू केला असता,हा गुन्हा फिर्यादीने किंवा त्याचा मित्र यांनी प्लॅन करून केला आहे,याबाबत माहिती काढण्यासाठी तपास केला असता,गुन्हेगारांच्या मागावर असताना माहिती मिळाली की,हा गुन्हा फिर्यादीच्या मित्राने त्याच्या मित्रांच्या मार्फत प्लॅन करून मिरज येथील दोन दोघांची मदत घेत गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली असता, आरोपी हा मिरज शहरात एका वाईनशॉप जवळ थांबला
असल्याची माहिती मिळाल्याने, त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे विचारपूस केली असता,त्यांनी गुन्हा केले असल्याचे सांगून आरोपीचा मित्र व गुन्हयातील जखमी यांच्या सांगण्यावरून, गुन्हा केल्याचे कबूल केले,पोलिसांनी गुन्हयातील ९२५ ग्रॅम,५६० मिली ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट असा ४५ लाख ८१ हजार ५२२ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिरज येथून ताब्यात घेतलेला युवक सांगली येथील होमगार्ड असून तो व्यसनाधिन आहे. तसेच दुसरा इलेक्ट्रॉनिक दुकानात सेल्समन म्हणून कामात असून त्यास शेअर मार्केट मध्ये मोठयाप्रमाणात तोटा झाल्याने तो कर्जबाजारी झाल्याने त्यामुळे त्याने मित्राच्या मदतीने गुन्हा केल्याचे सांगितले.गुन्हयाचा पुढील तपास सांगोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर हे करीत आहेत.ही कामगिरी सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, व सांगोला पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुहास जगताप सांगोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर,गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, श्रीकांत गायकवाड,पोलीस अंमलदार नारायण गोलेकर,मोहन मनसावाले,चालक समीर शेख, सांगोला पोलीस ठाण्याचे राहूल देवकाते,राहूल कोरे,सायबर पोलीस ठाण्याचे अन्वर अत्तार यांनी केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *