ईटीव्हीचे रिपोर्टर सचिन आव्हाड यांना राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार जाहीर…!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

दौंड तालुक्यातील पाटसचे पत्रकार सचिन जगन्नाथ आव्हाड यांना ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पातळीवरील पत्रकार संघटनेकडून राज्यस्तरीय दर्पण पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .अशी माहिती या संघनेचे केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल यांनी दिली.सचिन आव्हाड यांनी आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून,लेखणीतून सामाजिक,राजकीय तसेच विविध सामाजिक विषयांवर प्रभावी असे लेखन केल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.पत्रकारितेतील पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आव्हाड यांनी प्रभावीपणे अनेक विषयांवर लिखाण केले आहे.

अकोले येथील अंत्री येथील शताब्दी महोत्सव हॉल या ठिकाणी १५ व १६ नोहेंबर रोजी होण्याऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.देशातील विविध नामांकित पत्रकारांनी केलेल्या लेखणीचा आढावा घेऊन विविध क्षेत्रातील पत्रकारांना यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.सचिन आव्हाड यांना पत्रकारितेतील राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने झाल्याने त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *