डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणार : धनंजय मुंडे


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कार मित्र संघाच्या विविध मागण्यासंदर्भात आज बैठक पार पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून पुरस्कारार्थींना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वसाधारण, निमआराम व आराम गाड्या तसेच भाडे तत्वावर असलेल्या बसेसमधून मोफत प्रवास देण्याबाबत गृह विभागाला दिवाळीच्या आधी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. तसेच मानधनाबाबत वित्त विभागाला माहिती सादर करून याबाबतीतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,असे ते म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *